बुलडाणा- अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चा करणाऱ्या शेतकऱ्यांवर आज (दि. 26 जाने.) गोळीबार झाला.अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला. ही घटना अतिशय निंदनीय असून तीव्र शब्दात या घटनेचा आम्ही निषेध करतो. पण, केंद्र सरकारला या आंदोलनामध्ये हिंसा घडवून आणायची असून शेतकऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडायचा आहे. जेणेकरून शेतकऱ्यांनी हिंसा घडवली आहे, असा चित्र केंद्र सरकार तयार करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
...तरीही शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेतील