बुलडाणाRavikant Tupkar Arrested : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलडाणा पोलिसांनी अटक केली आहे. रविकांत तुपकर यांनी कापूस, सोयाबीनच्या भावाबाबत 29 तारखेला मंत्रालयात घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं रविकांत तुपकर यांना बुलडाणा पोलिसांनी सीआरपीसी 149 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज बुलडाणा पोलिसांनी अटक केली आहे. रविकांत तुपकर यांच्या अटकेनंतर बुलडाण्यात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पिकाला हमीभाव देण्याची मागणी :राज्यात विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला वाढीव दर मिळाण्यासाठी रविकांत तुपकर यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. कापूस, सोयाबीनसह इतर पिकाला त्यांनी हमीभाव देण्याची मागणी राज्यसरकारकडं केली होती. या मागणीसाठी तुपकर 29 नोव्हेंबरला मुंबईत मंत्रालयाला घेराव घालणार होते. कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी तुपकर यांनी बुलडाण्यात 20 नोव्हेंबरला शेतकरी एल्गार मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तुपकर यांनी कापूस, सोयाबीन पिकांना हमी भाव देण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्या आगोदरच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.