बुलडाणा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही. द्यायचं नाही तर लोकांना फसवता का? गंडवता का? असे सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून रोज १० शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राजू शेट्टींनी राज्य सरकारवर प्रहार केला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मी शेतकऱ्यांना तुम्हाला चिंतामुक्त करतो, कर्जमुक्त करतो, सातबारा कोरा करतो म्हणाले होते. आता जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नसल्याचे शेट्टी म्हणाले. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचेही शेट्टी म्हणाले.
हेही वाचा - नागपुरात मध्यान्ह भोजनातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू