महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव, मान्यवरांनी केले अभिवादन - बुलडाणा जिल्हा बातमी

या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमीची व जिजाऊप्रेमींची रीघ लागली आहे.

Rajmata jijau janmotsav
सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव

By

Published : Jan 12, 2020, 10:37 AM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आज राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त आज सकाळी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव, वंशज लखोजीराजे जाधव, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले.

या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमीची व जिजाऊप्रेमींची रीघ लागली आहे.

जिजाऊ माँ साहेबांचा जन्मोत्सव

हेही वाचा - शासकीय गोडाऊनमध्ये राशन माल न नेता बाहेरच होत होती परस्पर विल्हेवाट मात्र, प्रयत्न फसला

दरम्यान, या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तर छत्रपतींचे वारसदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संभाजीराजे भोसले, बाबाजीराजे भोसले, जनमेजयराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचासह अनेक नेतेमंडळीही उपस्थित राहणार आहे.

मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना देण्यात येणार आहे. तर कोण बनेगा करोडपती विजेत्या बबिता ताडे यांना मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण व जिजाऊ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा - शेगावात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, गोठ्यात घुसून ११ शेळ्या केल्या ठार

ABOUT THE AUTHOR

...view details