बुलडाणा- जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा सर्वोच्च असा विश्वभुषण मराठा पुरस्कार यंदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आला आहे. कोरोना काळात अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा सेवा संघाचा विश्वभूषण पुरस्कार
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भरीव अशी कामगिरी करून कोरोनावर नियंत्रण मिळवले याची दखल विविध राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टंसिंग ठेवत अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फेसबुक सोशल मीडियावर थेट लाईव्ह प्रसारण करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पुरस्कार देण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टंसिंग ठेवत अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फेसबुक सोशल मीडियावर थेट लाईव्ह प्रसारण करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह विविध मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भरीव अशी कामगिरी करून कोरोनावर नियंत्रण मिळवले याची दखल विविध राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतली.
-पुरस्कार मिळाल्याने खूप मोठे बळ मिळाले-
पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप मोठे बळ मिळाले आहे. भविष्यात आणखी चांगले काम करण्याची ताकद मिळाली आहे. कोरोनाच्या काळात जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा सेविका काम करत होते. एवढेच नव्हे तर रुग्णवाहिकांचे चालक, स्मशानभूमीत अग्नि देणारे माणसे या कामात सहकार्य करत होते. आपली जीवाची पर्वा न करता हजारो-लाखो जीव वाचावे म्हणून काम करत होते. त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी लीड फॉर्म फ्रंट म्हणून त्यांच्यासोबत उभा राहिलो. त्यामुळे आपल्या सोबत सरकार असल्याची भावना या काम करणाऱ्या त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोरनावर नियंत्रण मिळविण्यात आले.
-कोरोना काळात खासगी हॉस्पिटलमधील लूट थांबबली-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करताना राजेश टोपे यांनी सांगितले की, खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट चालली होती. ही कॉर्पोरेट हॉस्पिटल लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घ्यायचे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. याची दखल घेत सर्वसामान्य लोकांनाही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावे, यासाठी अत्यंत कमी दरात तेथे उपचार केले तेथे ऑडिटर बसवले. ज्या हॉस्पिटलने जास्त बिल घेतले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वसुली केली. कोरोनाच्या ज्या टेस्ट साडेचार पाच हजार रुपयात व्हायच्या त्याचे अपडेट करून त्या 700 रुपयेपर्यंत खाली आणले. त्यामुळे सर्वात स्वस्त उपचार आपल्या महाराष्ट्रात व्हायला लागले. सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आपण कोरोनासाठी काम केले. त्याची दखल घेत हा मराठा विश्वभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिला. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने काम करण्याचे बळ मिळाले. हा पुरस्कार महापुरुषांना आणि जे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत त्यांना मी अर्पण करतो, असे आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले.
-शेतकऱ्यांच्या मुलांना आवाहन-
तुम्ही नोकरीच्या पाठीमागे न लागता, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा, असे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मुलांना आवाहन केले. पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करा, असा राजेश टोपे यांनी सल्ला दिला. मराठा समाजालाआरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे टोपे यांनी सांगितले.
-बुलडाण्याच्या मेडिकल कॉलेजचा विषय नक्की मार्गी लागेल-
पुढे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आहे. कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक घरात दीड लाखापर्यंत रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. बुलडाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मेडिकल कॉलेजचा विषय नक्की मार्गी लागेल. माझ्या टेबलवर ते प्रकरण सहीसाठी आले. लवकरच बुलडाण्यात मेडिकल कॉलेजला मान्यता मिळेल, अशी ग्वाही देत राजेश टोपे यांनी दिले. मात्र ते ठिकाण सिंदखेडराजा की बुलडाणा हे तुम्ही ठरवा असेही टोपे यांनी सांगितले.
-जिजाऊ विकास आराखड्यासाठी कटीबद्ध-
जिजाऊ विकास आराखड्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लवकरच अजितदादा यांच्या उपस्थितीत आमदार राजेंद्र शिंगणे आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावणार असल्याचे नामदार राजेश टोपे यांनी सांगितले. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले की, जिजाऊ विकास आराखड्यासाठी देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असताना 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा आणि त्यानंतर साडेतीन कोटीचा विकास आराखडा मांडला होता. या दोन्ही विकास आराखड्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून विकास आराखडा मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.