महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणार तालुक्यात वरुणराजाची हजेरी; शेतकऱ्याना मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा - Lonar taluka

जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. परंतु या वर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले आहे. थोड्याफार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीच फरक पडला नसून आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

लोणार तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्याना दमदार पावसाची अपेक्षा

By

Published : Jun 22, 2019, 10:56 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे वातावरण थंड झाले असून परिसरात गारवा पसरला आहे. लोणार तालुक्यातील भुमराळा, वझर कासारी, देवानगरसह अनेक गावांमध्ये चारच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी राजा आनंदीत झाला. अचानक आलेल्या पावसाने अर्धा तास बॅटींग केली असली तरी शेतकर्‍यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकरी वर्ग पावसाची वाट पाहत आहेत.

लोणार तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्याना दमदार पावसाची अपेक्षा

बुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन हे महत्वाचे पीक आहे. जिल्ह्यात लागवडी योग्य क्षेत्रफळांपैकी 50 टक्केच्या आसपास सोयाबीन लागवड होते. मागील वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. परंतु, या वर्षी मृग नक्षत्र कोरडे गेले आहे. झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीच फरक पडला नसून आणखी दमदार पाऊसाची अपेक्षा सध्या शेतकऱ्यांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details