बुलडाणा - हवामान खात्याच्यावतीने १८ आणि १९ फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवारी १९ मार्चला रात्री जिल्ह्यातील मेहकर, चिखली, मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. तर बुलडाणा, नांदुरा, मलकापूर या तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतातील अनेक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान - thunderstorm
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, चिखली ,मोताळा या तालुक्यात गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा -मुंबईसाठी चार ते सहा आठवडे महत्वाचे, खाटा राखीव ठेवण्याचे रुग्णालयांना आदेश
या पिकांचे गारपिटीमुळे नुकसान
जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, चिखली, मोताळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटी मुळे शेतातील कांदा, भुईमूग, मूग, गहू या पिकांचे तसेच भाजीपाला आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्यामुळे आंबेही खराब झाले आहेत. नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांची चिंता वाढली आहे. तर ग्रामीण भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.
हेही वाचा -मुंबईत शुक्रवारी 42 हजार 740; तर आतापर्यंत 8 लाख 9 हजार 871 लाभार्थ्यांचे लसीकरण