बुलडाणा - राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा काही दिवसांपुर्वी दिला होता. यांनतर बुधवारी रात्री अमरावती येथी अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने त्यांच्याच जिल्ह्यातील खामगाव शहरातील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर धाड टाकून तपासणी केली. मात्र, या धाडीची माहिती आधीच लीक झाल्याने अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.
खामगांवात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड - अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाड
गुरुवारी रात्री खामगांव येथील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाकडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. पथकाने संपूर्ण गोडाऊनची तपासणी केली. मात्र, यात गुटखा सापडला नाही.
हेही वाचा -महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत अफरातफर; ठेवीदारांचे उपोषण
गुरुवारी रात्री खामगांव येथील राठी यांच्या मालकीच्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाकडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. पथकाने संपूर्ण गोडाऊनची तपासणी केली. मात्र, यात गुटखा सापडला नाही. यानंतर शहरातील त्यांच्याच मालकीच्या इतर ३ ठिकाणीही तपासणी करण्यात आली. मात्र, तेथेही काहीच मिळून आले नाही. धाडीची माहिती आधीच लीक झाल्याने पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.