शेगाव :आजमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांची (today is Indira Gandhi Jayanti) जयंती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी इंदिरा गांधी यांना भारत जोडो दरम्यान आदरांजली (Rahul Gandhi pays tribute to Indira Gandhi) वाहिली.
Indira Gandhi Jayanti : इंदिरा गांधी जयंती निमित्त राहुल गांधींनी वाहिली आदरांजली - Bharat Jodo Yatra
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती (today is Indira Gandhi Jayanti) निमित्त राहुल गांधी यांनी, आज त्यांना आदरांजली (Rahul Gandhi pays tribute to Indira Gandhi) वाहिली. शेगाव येथील कॅम्प एक मध्ये आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रज्ञा सातव, प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra), आज इंदिरा गांधी जयंती निमित्त महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शेगाव येथील गजाननदादा पाटील मार्केटयार्ड येथून सकाळी ६ वाजता यात्रेतील सहभागींनी प्रवास सुरू केला आणि जलंबकडे प्रयाण केले. ही पदयात्रा भास्तान मार्गे जाऊन जळगाव, जामोद शहरात रात्रीचा मुक्काम करणार आहे. यात्रेत बचत गटातील महिला आणि निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी देखील सहभागी झाल्या आहेत.
यात्रेच्या मार्गावर गांधींनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि स्थानिकही त्यांच्यासोबत चालले. रविवारी रात्री भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात बुरहानपूर येथे प्रवेश करेल. तेलंगणातून ७ नोव्हेंबरला यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात १५ विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघांतुन गेली. 14 दिवसात यात्रेने 382 किलो मीटर अंतर कापले. गांधींनी महाराष्ट्रातील दोन जाहीर सभांना संबोधित केले.