महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीएए व एनआरसी विरोधात शेगाव तहसील कार्यालयासमोर धरणे - CAA Opposition Buldana

संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरूच आहे. दरम्यान, सोमवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत 'तहाफ्फुज-ए-शरियत', संविधान बचाव समिती आणि शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

buldana
आंदोलनाची दृश्ये

By

Published : Jan 21, 2020, 3:13 PM IST

बुलडाणा- राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व सुधारणा कायद्या (सीएए) विरोधात शेगावात विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून सोमवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या एक दिवसीय धरणे आंदोलनात 'तहाफ्फुज-ए-शरियत' कमेटी, संविधान बचाव संघर्ष समिती व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

आंदोलनाची दृश्ये

संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात त्याविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरूच आहे. दरम्यान, सोमवारी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत 'तहाफ्फुज-ए-शरियत', संविधान बचाव समिती आणि शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून तहसील कार्यालयासमोर भव्य मंडपात समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांचे जवळपास ५०० समर्थक सहभागी झाले आहेत. दरम्यान, दुपारी ४ वाजता तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेही वाचा- मध्यप्रदेशातील जंगलात आढळला मलकापूर येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details