बुलडाणा -शेगाव येथील हॉटेल अंबर वाईन, बार अँड रेस्टोरंटमध्ये देहव्यापार सुरु असल्याची माहितीवरून पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी एका युवतीसह एक ग्राहक आणि हॉटेल मॅनेजरला ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी देहव्यापार कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांना अटक -
नागपूर पोलिसांकडून शेगावातील काही लॉजवर देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शनिवारी रात्री १० वाजता बाळापूर रोडवरील हॉटेल अंबर वाईन बार अँड रेस्टोरंटवर छापा टाकला. यावेळी दोन जण देहविक्री करताना आढळून आले. यामध्ये हॉटेल अंबरचा मॅनेजरला प्रवीण लक्ष्मण तायडे (२३) वर्षे रा. म्हाडा कॉलनी शेगाव व अकोला येथील एका ग्राहकाला पोलिसांनी अटक केली. यावेळी कोलकत्ता येथील एक युवती मागील ५ दिवसांपासून याच हॉटेलमध्ये राहत असून तिच्याकडून देहविक्री करवून घेत असल्याचे समोर आले आहे. यावेळी आरोपी जवळून नगदी ४ हजार ४०० रुपये, कंडोम पाकीट आणि अनवॉंन्टेड नावाच्या गोळ्यांचे पाकीट असा एकूण ४ हजार ४८० रपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन्ही आरोपीविरुद्ध कलम ३,४,५,अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच युवतीला सुधारगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - ऑक्सिजनसाठी केंद्राने राज्याला दिलेला निधी कुठे गेला? भाजप आमदाराची चौकशीची मागणी