बुलढाणा:रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची आज जय्यत तयारी सुरू आहे. स्वाभिमानी जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची हजेरी लागत आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे.
सकाळी मुंबईकडे कूच करणार:रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रविकांत तुपकर शेतकऱ्यांसह बुलढाणा शहरातील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर येथून आज सकाळी मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यांचा जाण्याचा मार्ग बुलढाणा शहर- धाड-भोकरदन-सिल्लोड-छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)-अहमदनगर-चाकण- लोणावळा असा सांगण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर रात्रीचा मुक्काम पनवेलमध्ये करणार आहेत व 24 नोव्हेंबरच्या सकाळी 10.00 वा. मुंबईत मंत्रालयाशेजारील अरबी समुद्रात जलसमाधी घेणार असा इशारा देण्यात आला आहे.