बुलडाणा -शहरासह ग्रामीण भागात आज बुधवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच पावसामुळे शेतजमीन भिजून शेतीच्या मशागतीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बुलडाण्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, वातावरणात गारवा - बुलडाणा लेटेस्ट न्युज
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, आज विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली,जळगाव जामोद, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, देऊळगाव राजा या तालुक्यात 93.2 मिमी पावसाची नोंद झाली.
बुलडाण्यात मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, वातावरणात गारवा
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, आज विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, चिखली,जळगाव जामोद, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मेहकर, सिंदखेडराजा, मोताळा, देऊळगाव राजा या तालुक्यात 93.2 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच सरासरी 0.94 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.