महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हॅट्ट्रीकच्या उंबरठ्यावर - प्रतापराव जाधव

प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, विजयाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे.

प्रतापराव जाधव

By

Published : May 23, 2019, 9:05 PM IST

बुलडाणा - लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार तथा उमेदवार प्रतापराव जाधव यांनी हट्रिक केल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर जवळपास १ लाख ३५ हजारांची आघाडी घेतली आहे.

प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया

प्रतापराव जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, विजयाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की मतदारांनी विकासकामांच्या बाबतीत विश्वास दाखवला आहे. नरेंद मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विश्वास दाखवला त्यामुळे त्यांचे आभार. लोकांनी मतदान करताना देशाची सुरक्षा आणि विकास पाहून मतदान केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढची ५ वर्षे आणखिन चांगली कामे करण्यासाठी देशातील जनतेने एनडीएचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details