बुलडाणा - विधवा 28 वर्षीय शिक्षिकेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरूणाने आत्महत्या केली आहे. प्रभूदास बोळे असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना 16 मे रोजी खामगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे घडली. आता त्या तरूणाच्या पत्नीच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी शिक्षिकेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिला अटकही केली आहे.
विधवा शिक्षिकेसोबतची मैत्री भोवली, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या हेही वाचाः-'आई-बाबा बाय..' अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
ओळखीनंतर शिक्षिकेची फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी
खामगाव तालुक्यातील पहुरजीरा येथील प्रभुदास बोळे याने 16 मे रोजी रात्री विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्याची पत्नी वर्षा बोळे यांनी पोलिसांत संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रारी दिली आहे. या शिक्षिकेमुळे प्रभुदासने आत्महत्या केली असल्याचा आरोप वर्षा यांनी केला आहे. या शिक्षेकेला लगेच अटक करावी अशी मागणी तिने केली आहे. ही शिक्षिका प्रभुदासला ब्लॅकमेल करत होती, याची माहिती तिला काही दिवसांपूर्वी समजली होती. पण प्रभुदास एवढे टोकाचे पाऊल उचलेल असे तिला वाटले नव्हते.
हेही वाचाः-प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवून धमकावल्याने २५ वर्षीय प्रियकराची आत्महत्या
पोलिस तक्रारीत हे सांगितले आहे...
'सुटाळा येथे आपल्या 2 मुलींसह राहत असलेल्या एका विधवा शिक्षिकेने प्रभूदास बोळे याच्यासोबत ओळख केली. शिक्षिका त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल करायची. चॅटींगही करायची. दोघांमध्ये सातत्याने बोलणे व्हायचे. त्यांची ओळख कशी झाली याची माहिती नाही. पण दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. आमच्या घरीही ती यायची. मात्र, काही दिवसानंतर या शिक्षिकेने प्रभूदासला फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. याची माहिती काही दिवसांनी त्याच्या पत्नीला मिळाली. तिने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रभूदास वैतागून गेला होते. तरीही शिक्षिका पैशांसाठी ब्लॅकमेल करतच होती. त्यामुळे प्रभूदासने आत्महत्या केली. तसा मॅसेजही आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्याला पाठवला आहे', असे या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचाः-हरवलेले 1 लाख 72 हजार रुपये पोलिसांनी शोधले अवघ्या तीन तासांत, वृद्धाला अश्रू अनावर
शिक्षिकेला अटक
दरम्यान, पोलीस तपासात ही शिक्षिका पैशांसाठी तगादा लावत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या शिक्षिकेला अटक केली आहे. तिची चौकशी करण्यात येत आहे. यात आणखी काही लोक सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दिशेने तपास करुन आणखी काही पुरावे हाती लागतात का, याचाही तपास करण्यात येत आहे.
हेही वाचाः-या फरशीवर पाणी टाकलं, की लगेच उकळतंय.. बघा यामागे काय आहे अद्भत चमत्कार