महाराष्ट्र

maharashtra

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येची चौकशी करावी, गोर सेनेची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्येची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी गोर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

By

Published : Feb 16, 2021, 3:52 PM IST

Published : Feb 16, 2021, 3:52 PM IST

गोर सेना
गोर सेना

बुलडाणा - राज्यभरात पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येची चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्याचे मंत्री संजय राठोड नाव चर्चेत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी बुलडाण्यातून आज (सोमवार) संत सेवालाल महाराज यांच्या 292 व्या जयंती दिवशी गोर सेनेच्या वतीने करण्यात आली.

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येची चौकशी करावी
बुलडाणा शहरातील वसंतरावजी नाईक चौकात संत सेवालाल महाराज यांच्या 292 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विजयराजजी शिंदे यांनी पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गोर सेना विदर्भ अध्यक्ष सोनू भाऊ चव्हाण, गोरसिकवाडी संयोजक भुजंग राठोड निलेश, सहसंयोजक संजू चव्हाण, प्राध्यापक आत्माराम राठोड, डॉक्टर संदेश राठोड सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.जयंतीनिमित्त बंजारा समाजाचा पारंपारीक पद्धतीचा पोशाख परिधान करून महिलांनी व समाज बांधवांनी वसंतरावजी नाईक चौकापासून तहसिल चौक, एडेड चौक, त्रिशरण चौक होत सुंदरखेड पर्यंत शोभा यात्रा काढली.

पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा-

पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येबद्दल राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्यावर राजकीय दृष्ट्या षडयंत्र रचले जात आहे. म्हणून पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सखोल चौकशी करावी. पूजा चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा. सोबतच संजय राठोड यांच्यावर जे गालबोट लागत आहे. तो गालबोट लागू नये आणि जे कोणी असे करत आहे. त्यांचा आम्ही समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया बुलडाणा शहरातील बंजारा समाजाचे कारभारी विठ्ठल चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा-दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details