बुलडाणा- जिल्ह्यात बुधवारी 7 एप्रिल रोजी तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे यात शेगाव येथील दोन रुग्ण आहेत. त्यामळे आता शेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या तीन वर गेली असून ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत तो भाग पूर्ण तीन किलोमीटरपर्यंत सील करण्यात आला आहे. नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र कायम आहे. शेगाव शहरात रुग्णांची संख्या तीनवर गेल्यानंतर शहरात पोलीस प्रशासनातर्फे पथसंचलन करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण शहरातून पोलिसांनी पथसंचलन केला आहे.
बुलडाण्याच्या शेगाव शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन... - shegaon
शेगांव शहरासह जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा वेळ सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात येत आहे
शेगाव शहरासह जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचा वेळ सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात येत आहे
शेगाव शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये याकरिता व नागरिकांनी गांभीर्य बाळगून मनात भीती न ठेवता घरामध्येच राहून कोरोना विषाणूचा प्रसार रोखावा. जे रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्याशी जर कोणाचा संपर्क झाला असेल तर स्वतः पोलीस प्रशासनाला कळवून आपली चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन बुलडाणा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.