बुलडाणा -सरकारी कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणाहून मागील काही दिवसांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा ( Police Recovered Theft Bike From Well ) या चोरीचा छडा लावण्यासाठी कामाला लागली. त्यात पोलिसांना आता मोठे यश आले असून पोलिसांनी सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम वय ( ३८ ) याला ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चक्क एका विहिरीत दुचाकी ( Police Recovered Theft Bike In Buldana ) टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन पोलिसांनी शेगाव परिसरातील एका विहिरीतून दुचाकी बाहेर काढायला सुरुवात केली आहे.
चोरटे दुचाकी टाकायचे विहिरीतजिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी लंपास करणारी टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दुचाकीचे स्पेअरपार्ट काढून चोरटे विहिरीत ( Theft Bike In Well At Buldana ) फेकत होते. शेगाव रस्त्यावर विहिरीतून पोलिसांनी दुचाकी काढणे सुरू केले आहे. मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचे ( Police Recovered Theft Bike From Well ) प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरणारी टोळीच बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय होती. दरम्यान पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम वय ( ३८ ) याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली होती. यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली.