महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी ताब्यात - Police raid on fake asphalt base

खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावरील पुनम ढाब्याच्या मागे बनावट डांबर तयार करण्यात येत होती. ही माहिती मिळाल्यानंतर नांदुरा व जलंब पोलिसांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (31 जानेवारी) सायंकाळी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

jambal police
खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By

Published : Feb 4, 2020, 9:40 PM IST

बुलडाणा -खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आमसरी शिवारामध्ये बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

खामगाव-नांदुरा महामार्गावरील बनावट डांबराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

खामगाव-नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावरील पुनम ढाब्याच्या मागे बनावट डांबर तयार करण्यात येत होती. ही माहिती मिळाल्यानंतर नांदुरा व जलंब पोलिसांनी संयुक्तरित्या शुक्रवारी (31 जानेवारी) सायंकाळी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आमसरी शिवारामधील पुनम धाब्याच्या पाठीमागे डांबर तयार करण्याचा गोरखधंदा सुरू होता. पेवाराम पटेल, किसन लालूजी भिल, मो. जावेद खान जुबेर खान, मोहम्मद जाईद, मो. इस्राईल आधी पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्या जवळून बनावट डांबराने भरलेले टँकर (क्रमांक एम. पी. 04 एच. ई 3529, एमएच. 04 एफ. वाय. 4473, एमएच 04 जी. एफ. 1638) ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास ठाणेदार गौतम इंगळे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details