महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भेसळ करणाऱ्या डांबर प्लँटवर पोलिसांचा छापा; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३ अटकेत - dambar khamgaon

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये एका डांबर प्लँटमध्ये नकली डांबर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

dambar
भेसळ करणाऱ्या डांबर प्लँटवर पोलिसांचा छापा

By

Published : Feb 14, 2020, 10:39 AM IST

Updated : Feb 14, 2020, 10:50 AM IST

बुलडाणा - भेसळ करणाऱ्या डांबर प्लँटवर पोलिसांचा छापा टाकला आहे. यात १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. या महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे.

भेसळ करणाऱ्या डांबर प्लँटवर पोलिसांचा छापा

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये एका डांबर प्लँटमध्ये नकली डांबर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात 14 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर, तीन आरोपींना अटक करण्यात आले असून एक आरोपी फरार झाला आहे.

जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसीमध्ये रस्ते तयार करण्यासाठी वापरणाऱया डांबरमध्ये भेसळ केली जात होती. याची तक्रार पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत पोलीस महासंचालकांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना ई-मेलद्वारे सदर घटनेची माहिती कळवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने पोलीस उपनिरीक्षक इम्रान इनामदार यांच्या नेतृत्वात खामगाव येथील एमआयडीसीमधील मिथून मसाला पापड या ठिकाणी छापा टाकला. या युनिटमध्ये शुद्ध डांबरमध्ये मार्बल पावडर मिसळून भेसळ करत असल्याचे निरीक्षणात आले. त्यानंतर याठिकाणी सोनू बळीराम सरोज, बबलू पंढरीनाथ महाजन, मिथून सुखदेव कळसकार या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

यावेळी डांबर भेसळसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉयलर, मिक्सर, लोखंडी बॅनर, पांढऱ्या रंगाची मार्बल पावडर, शंभर किलो आणि एका ट्रकसह १४ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर खामगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण कटक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात कलम ४२०, ४०८,४११ ३४ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सर्फराज अहेमद रमझान अहेमद (रा. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश) हा फरार आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, पोलीस लक्ष्मण कटक, रघुनाथ जाधव आणि संभाजी आसोलकर यांनी पार पाडली. खामगाव विभागातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. डांबरमध्ये भेसळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. याआधी शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अशीच कारवाई झाली होती.

हेही वाचा -

शिदोरीत तर वस्तुस्थिती, भाजपकडून सावरकरांचा मिठाच्या खड्यासारखा वापर

Last Updated : Feb 14, 2020, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details