महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा बंद; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, पालकांचे पाल्यांसह उपोषण - school

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निर्णयामुळे १२४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार असल्याचे चित्र आहे. तसेच शाळेत पोलिसांचे पाल्य कमी असून शाळा तोट्यात चालत आहे, असे म्हणत शाळा बंद करत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. मात्र, याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा अचानक बंद

By

Published : Jun 25, 2019, 5:40 PM IST

Updated : Jun 25, 2019, 7:27 PM IST

बुलडाणा - पोलीस वेल्फेअरमार्फत चालविण्यात येणारी पोलीस पब्लिक शाळा अचानक बंद करण्याच्या निर्णय पोलीस अधिक्षकांनी घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर शाळा सुरू होण्याच्या केवळ २ दिवस आधीच ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. याविरोधात पालकवर्गाने शाळा प्रशासनाविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

बुलडाण्यात पोलीस पब्लिक शाळा बंद

शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये, यासाठी सोमवार २४ जूनपासून १० पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शिक्षणमंत्र्यांनी न्याय द्यावा, अशा घोषणा विद्यार्थी देत होते. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निर्णयामुळे १२४ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे, तर शाळेत पोलिसांच्या पाल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, शाळा तोट्यात चालत असल्याचा ठपका ठेवत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे, मात्र याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. बुलडाण्यात पोलीस वेल्फेअरमार्फत चालविल्या जाणाऱ्या पोलीस पब्लिक शाळेत नर्सरीसह इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १२४ विद्यार्थीं शिक्षण घेत असून ११ शिक्षकांसह २ अन्य कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. शाळेतील मुख्यध्यापिका यांनी पालकसभा बोलावून शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या काही दिवसपूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने शाळा बंद होत असल्याचे पोलीस वेल्फेअरकडून पालकांना सागंण्यात आल्यामुळे पालकवर्गामध्ये एकच गोंधळ उडाला. शैक्षणिक सत्र सुरू होण्यास केवळ दोन दिवस आहेत १२४ विद्यार्थ्यांना अचानक प्रवेश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे शाळा बंद न करण्याचे निवेदन पालकवर्गाने मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, सामाजिक न्यायमंत्रीसह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांसह शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

पालकांसोबत शाळेतील लहान-लहान विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांना या शाळा बंद न करण्याची विनंती करीत शिक्षणमंत्री लक्ष द्या, आशा घोषणा देत आहेत. वरिष्ठांकडून दौऱ्याच्या वेळी पोलीस पब्लिक शाळेला भेटी देण्यात आल्या. यादरम्यान शाळेत पोलीस पाल्यांचा अत्यल्प समावेश होता. १२४ विद्यार्थ्यांमध्ये केवळ १८ च पोलिसांचे पाल्य पब्लिक शाळेत शिक्षण घेत आहेत. यामुळे शाळा तोट्यात चालत आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. यामुळे शाळा बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्याने कार्यवाही करीत असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचे पगार, २०० अधिकारी, २ हजार ७०० कर्मचाऱ्यांच्या पगारातून देत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले आहे.

उपोषणापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी अनभिज्ञ
पोलीस पब्लिक शाळा बंद करू नये, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचे पालक आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्राथमिक प्रभारी शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना विचारल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला कसलीही माहिती नाही. या सांदर्भात एका पालकांचा फोन आला होता. मात्र, याबाबत निवेदन नसल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 25, 2019, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details