बुलडाणा - प्रेमी युगुलाला मारहाण झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. त्या प्रेमी युगुलाला शोधून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
प्रेमी युगुलाला मारहाणीच्या 'त्या' व्हिडिओची पोलिसांनी घेतली दखल, तपास सुरू - Buldhana crime
दोघेही नांदुरा बसस्थानकावर बसून बोलत असताना मुलीच्या चुलत भावाला ही बाब माहित झाली. त्याने घटनास्थळावर जाऊन दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
प्रेमी युगुलाचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. या मुलाच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले आहे. सोशल मीडिया सेलने व्हायरल मीडियाची शहानिशा केल्याचेही त्यांनी सांगितले.
काय घडली होती घटना-
मारहाण करण्यात आलेले प्रेमी युगुल हे जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध या गावातील रहिवाशी आहे. तरुणी ही खामगाव येथे पॉलिटेक्निकची परीक्षा देत आहे. तर मुलगा कला पदवीची परीक्षा देत आहे. हे दोघेही नांदुरा बसस्थानकावर बसून बोलत असताना मुलीच्या चुलत भावाला ही बाब माहित झाली. त्याने घटनास्थळावर जाऊन दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.