बुलडाणा- पॅरोलवर सुटून पळून गेलेल्या खुनातील आरोपीला पोलिसांनी तब्बल 15 वर्षानंतर पकडले आहे. आरोपीला जळगाव जामोद पोलिसांनी मुंबई येथून अटक केली.
पॅरोलवर सुटून पळून गेलेल्या खुनातील आरोपीला तब्बल 15 वर्षानंतर अटक - arrest
सुभाष रामदास गवई संचित रजेवर जेलमधून बाहेर आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता.
सुभाष रामदास गवई हा 51 वर्षीय आरोपी बुलडाणा जेलमध्ये एका खून प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. सदर गुन्हेगार हा 2004 साली संचित रजेवर जेल मधून बाहेर आला होता. मात्र तेव्हापासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलिसात कलम 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपी नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेत गुन्हेगार सुभाष गवई याला अटक करण्यात यश मिळवले. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर बुलडाणा जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.