बुलडाणा - कोरोनाग्रस्त असलेल्या आरोपीला उपचारासाठी सोबत घेऊन कर्तव्यावर आलेल्या पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत अपंग शाळेतील कोविड सेंटरमध्येच धिंगाणा घातल्याचा प्रकार एका व्हिडिओतून समोर आला आहे. यावेळी कोविड सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते "फुल्ल टू" झालेल्या या पोलिसाने उलट त्यांनाच दमदाटी केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
VIDEO : कोविड सेंटरमध्ये पोलिसाचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा
बुलडाण्याच्या अपंग विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये अटक केलेल्या आरोपीसोबत दोन पोलिसांची ड्युटी लागली होती. मात्र या दोन पोलिसांपैकी एका पोलीस शिपायाने दारू पिवून फुल्ल टू ऑन झाले. दारूच्या नशेत या पोलीस कर्मचाऱ्याने कोरोना वार्डात भरती करण्यात आलेल्या आरोपीच्या बेडच्या खाली झोपून धिंगाणा घातला.
बुलडाण्याच्या अपंग विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये अटक केलेल्या आरोपीसोबत दोन पोलिसांची ड्युटी लागली होती. मात्र या दोन पोलिसांपैकी एका पोलीस शिपायाने दारू पिवून फुल्ल टू ऑन झाले. दारूच्या नशेत या पोलीस कर्मचाऱ्याने कोरोना वार्डात भरती करण्यात आलेल्या आरोपीच्या बेडच्या खाली झोपून धिंगाणा घातला. यावेळी कोविड सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यांनी या पोलिसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता या पोलीस कर्मचाऱ्याने कोविड सेंटर मध्ये धिंगाणा घातला. उपस्थितांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. हा प्रकार 26 जूनचा असल्याचे बोलल्या जात आहे. आपल्या कर्तव्याचे तीनतेरा वाजवणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.