महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात मध्यरात्री डाक पार्सल कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या 26 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लॉकडाऊनच्या दरम्यान बुलडाण्याच्या मलकापूर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता मालवाहू कंटेनरमधून 26 लोक बीडहून उत्तर प्रदेशकडे जात होते. बुलडाणा शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

buldana corona update
बुलडाण्यात मध्यरात्री डाक पार्सल कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या 26 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By

Published : Apr 2, 2020, 4:32 PM IST

Updated : Apr 2, 2020, 6:07 PM IST

बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात डाक पार्सल मालवाहू कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या 26 लोकांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी 2 एप्रिलच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास समोर आली. या 26 लोकांना ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे लोक बीडहून उत्तर प्रदेशकडे जात होते.

बुलडाण्यात मध्यरात्री डाक पार्सल कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या 26 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
लॉकडाऊनच्या दरम्यान बुलडाण्याच्या मलकापूर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता मालवाहू कंटेनर गस्तिवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक अमित जाधव आणि त्यांच्या पथकाला आढळून आले. संबंधित कंटेनरवर संशय आल्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता, त्यात 26 लोक आढळून आले. हे लोक बीडहून उत्तर प्रदेशकडे जात असल्याची माहिती मिळाली. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 26 लोकांचे जेवण्यासह राहण्याची व्यवस्था शासनाच्यावतीने उभारण्यात आलेल्या येथील मलकापूर नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आल्याची माहिती, ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी दिली.
Last Updated : Apr 2, 2020, 6:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details