बुलडाणा- पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी युद्धस्तरावर काम सुरू आहे. खामगाव तालुक्यामध्ये 19,500 पात्र शेतकऱ्यांपैकी 19,300 शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आलेला आहे. विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी तालुकास्तरावर दक्षता समिती स्थापन केल्या जाऊन यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राहतील अशी माहिती कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला. ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
पीएम किसान योजनेचे काम युद्धस्तरावर सुरू; कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडेंची माहिती - युद्धस्तरावर
विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी तालुकास्तरावर दक्षता समिती स्थापन केल्या जाईल. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हापातळीवर तात्काळ निकाली काढण्यात येतील.
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास ज्या बँका कुचराई करणार आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार असून यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱयांना सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगतले. विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी तालुकास्तरावर दक्षता समिती स्थापन केल्या जाईल. यामध्ये शेतकऱयांचे प्रतिनिधी राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हापातळीवर तात्काळ निकाली काढण्यात येतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील धरणफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील बंधारे सुरक्षित आहेत काय असा प्रश्न युवासेनेने केला. त्यावर बोंडे यांनी विदर्भातील सर्व बंधारे सुरक्षित असल्याचे सांगतले. तसेच कृषी विभागामार्फत केलेल्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.