महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय नराधमाचा लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड - बुलडाणा जिल्हा बातमी

ही घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी 60 वर्षीय आरोपीस अटक करण्यात आली आहे. गजानन ज्ञानोबा मोरे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Buldana
अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय नराधमाचा लैंगिक अत्याचार

By

Published : Mar 12, 2020, 10:44 AM IST

बुलडाणा- चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीवर एका 60 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी 60 वर्षीय आरोपीस अटक करण्यात आली आहे. गजानन ज्ञानोबा मोरे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय नराधमाचा लैंगिक अत्याचार

हेही वाचा -सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन....

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन ज्ञानोबा मोरे या व्यक्तीच्या घराशेजारी अल्पवयीन मुलगी व आरोपीची नात खेळत होत्या. त्यावेळी मोरे यांनी स्वतःच्या नातीला आपल्या बायको सोबत जाण्यास सांगितले आणि त्या मुलीला शेतातील पाईप उचलण्यास मदत कर, असे सांगितले.

त्यानंतर ती मुलगी मोरेसोबत शेतात गेली. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची माहिती मुलीने आपल्या आईला सांगितले. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठत अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा -कोरोनाबाबत खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका ; बुलडाणा जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details