बुलडाणा- कोरोनाच्या संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांचे दोन महिन्याचे वेतन थकविणे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ सहायक (आस्थापना) जयदीप ताठे व त्यांच्या अधिनस्त अनिल पवार व किशोर उबरहंडे या लिपिकांना चांगलेच महागात पडले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी वरिष्ठ सहाय्यकाला तडकाफडकी निलंबित करून दोन लिपिकांची बदली केली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.
कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांचेच वेतन थांबवले; वरिष्ठ सहायक निलंबित - buldhana news updates
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी वरिष्ठ सहायकास तडकाफडकी निलंबित करून दोघा लिपिकांची बदली केली, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसवर अत्यावश्यक सेवेतील पोलीस आणि डॉक्टर हेच लढताना दिसत आहे. अशातच कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून थांबविण्यात आले होते. वेतन थांबविल्याबाबत डॉक्टरांनी याची माहिती बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांच्याकडे दिली होती. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ सहायक (आस्थापना) जयदीप ताठे व त्यांच्या अधिनस्त अनिल पवार व किशोर उबरहंडे या लिपिकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर सदर कारवाई करण्यात आली.