बुलडाणा-कोरोनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला असून निवडणुकीपुर्वी आरडाओरड करणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने कात्रज घाट दाखवला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी कॉंंग्रेसवर केली आहे. ते अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रा.नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ बुलडाण्यातील चिखली येथे आयोजित सभेत बोलत होते.
सत्तेसाठी मित्रपक्षाने बेईमानी केली-
राज्यात तुम्ही आम्हालाच निवडून दिले. मात्र, सत्तेसाठी आपल्या मित्रपक्षाने बेईमानी केली आणि नादान पक्षासोबत हातमिळवणी केली, अशी परखड टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.