महाराष्ट्र

maharashtra

जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; एअर लिकेजच्या पाण्यावर भागवतायेत तहान

By

Published : Oct 11, 2019, 11:52 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. डिजिटल इंडिया, शाईन इंडिया आणि आता गावागावाचा सर्वांगीण विकास या घोषणा सध्या निवडणुकीच्या प्रचारात दिल्या जात आहेत. मात्र, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून दूर आहेत.

पाईपलाईनच्या एअर लिकेजवरून पाणी भरताना नागरिक

बुलडाणा -राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, जिल्ह्यातील शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील 25 गावातील रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. वान धरणातून शेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअर लिकेजवरून सध्या हे रहिवासी आपली तहान भागवत आहेत.

जळगाव जामोदच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती


विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील नेते जोरदार प्रचार करत आहेत. जळगाव जामोद मतदारसंघातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. डिजिटल इंडिया, शाईन इंडिया आणि आता गावागावाचा सर्वांगीण विकास या घोषणा सध्या निवडणुकीच्या प्रचारात दिल्या जात आहेत. मात्र, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यातील अनेक गावे विकासापासून दूर आहेत.

हेही वाचा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफी प्रकरणी सीआयडी चौकशी करा; औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश


जळगाव जामोद शहराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही ढिसाळ आहे. नागरिकांनी याबाबत अनेकदा आपल्या अडचणी सरकारदरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. सरकारकडून कुठल्याही ठोस उपायोजना झाल्या नाहीत.
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी पोहोचवले जात असल्याचा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जातो. प्रत्यक्षातील स्थिती मात्र वेगळी आहे. वान धरण ते शेगाव हे ७२ किलोमीटरचे अंतर आहे. यादरम्यान असलेल्या पाईपलाईनच्या एअर लिकेजमधून निघणारे पाणी या भागातील हजारो नागरिकांना नवसंजीवनी देणारे ठरत आहे.

हेही वाचा - भाजपमुळे देश आर्थिक संकटात - सुजात आंबेडकर

गावातील नळांना पाणी नाही. बोरवेलचे खारे पाणी पिण्यायोग्य नाही. गावाबाहेर दोन-तीन किलोमीटर अंतर जाऊन नागरिक पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या मनात लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र संताप आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details