महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Panganga River : पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ - चला जाणूया नदीला उपक्रम

बुलडाणा जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात ( Panganga river will be cleaned ) येणार आहे. या उपक्रमात पैनगंगा नदीचे ( Panganga River ) 84 किलोमीटर पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

Panganga River
Panganga River

By

Published : Jan 7, 2023, 4:28 PM IST

पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ

बुलडाणा -जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा ( Panganga River ) समावेश करण्यात आला. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार ( Panganga river will be cleaned ) आहे. यातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

चला जाणूया नदीला उपक्रम - पैनगंगा नदीसोबतच नळगंगा, ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. हे सर्व लोकसहभागातून होणार आहे. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवसभर श्रमदान करणार आहे.

अजिंठा डोंगररांगेत नदीचा उगम - पैनगंगा नदी अजिंठा डोंगररांगेतील बुलढाणा जिल्ह्यातील मढ गावातील शिवारातील बुडनेश्वर महादेवाच्या मंदिरातून उगम पावते. उगमानंतर नदी बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यांच्या दक्षिणेकडील भागातून आग्नेय दिशेला वाहते. नंतर ती यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाऊन यवतमाळच्या पूर्व सीमेवर बल्लारपूर (चंद्रपूर) येथे वर्धा नदीच्या उजव्या तीरावर जाऊन मिळते. ही नदी वाशीम, यवतमाळ जिल्ह्याची दक्षिण सीमा बनवते. पैनगंगेची लांबी ४९५ किमी आहे. सर्व उपनद्यांसह एकूण ड्रेनेज क्षेत्र 23 हजार 898 चौरस किमी आहे.

पैनगंगेच्या प्रमुख उपनद्या -कयाधू ही पैनगंगेच्या उजव्या तीरावर वाहणारी एकमेव नदी आहे, तर पुस, अडाण, अर्णा, वाघाडी, खुनी या पैनगंगेच्या प्रमुख उपनद्या आहेत. ही नदी सिंचनाच्या दृष्टीने उपयुक्त असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरजवळ या नदीवर इसापूर धरण बांधण्यात आले आहे. हे 1968 मध्ये बांधले गेले. या धरणाची क्षमता 964 दशलक्ष घनमीटर आहे. या धरणात उजवे, डावे असे दोन कालवे आहेत. हा कालवा नांदेड यवतमाळ हिंगोली जिल्ह्यातील शेतीसाठी उपयुक्त आहे. एवढेच नाही तर या कालव्याचे पाणी आंध्र प्रदेशात पोहचत असून, तेथून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. देऊळघाट, वणी, पुसद, पांढरकवडा, चिखली, मेहेकर ही पैनगंगा नदीपात्रातील प्रमुख शहरे आहेत.

पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा - किनवट तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्रकुंड नावाचा धबधबा आहे. नदीचा प्रवाह खडकांनी विभागलेला आहे. सोनधाबी, सहस्रकुंड धबधबे पैनगंगा अभयारण्यातील प्रमुख आकर्षणे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details