बुलडाणा - प्रतिपंढरपूर असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी आज दुपारी शहरातून गज, अश्व, टाळ मृदंगांच्या निनादात पालखी काढण्यात आली. यावेळी या सोहळ्याचे मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाले. या पालखीदरम्यान संपूर्ण शहर 'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमले होते.
'गण गण गणात बोते'च्या जयघोषाने दुमदुमली विदर्भाची पंढरी - गजानन महाराज प्रकटदिन
शनिवारी संत गजानन महाराजांचा १४२ वा प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून १ हजार ५२७ दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. यासह जवळपास दीड लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा -'गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', शेगावात भरला भक्तांचा मेळा
शनिवारी संत गजानन महाराजांचा १४२ वा प्रगटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून १ हजार ५२७ दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या. यासह जवळपास दीड लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. दुपारी निघालेली ही पालखी संपूर्ण शहरातून हरी नामाचा जयघोष करत सायंकाळी ७ वाजता मंदिरात प्रवेश करणार आहे. त्यानंतर गजानन महाराजांच्या आरतीने या उत्सवाची सांगता होईल. देशभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवारी रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले होते.