बुलडाणा - राज्यासह देशभरात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या भाववाढीची कारणे वेगवेगळी असली तरी राज्यात झालेली अतिवृष्टी हे मुख्य कारण समोर येत आहे. कांदा सध्या डोळ्यात पाणी आणत असून आज (बुधवारी) 100 ते 120 रुपये प्रति किलो भावाने बाजारात कांद्याची विक्री होत होती.
कांद्याने रडवले...! डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला - Onion price buldana news
राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला आला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. जास्त पावसामुळे नाशिक,अहमदनगर येथील कांद्याचे नुकसान झाले आहे.
![कांद्याने रडवले...! डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला onion-prices-increase-in-buldana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5270160-thumbnail-3x2-buldana.jpg)
हेही वाचा-स्मिथला पछाडत किंग कोहली पहिल्या स्थानी विराजमान
राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याचे पिक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. डाॅलरपेक्षा जास्त भाव कांद्याला आला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या डोळ्यात जणू पाणी येत आहे. जास्त पावसामुळे नाशिक,अहमदनगर येथील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी आल्याने भाववाढ झाल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात नवीन कांदा 70 ते 80 तर जुना कांदा 100 ते 120 रुपये किलो विकला जात आहे. पुढील काही दिवस हे भाव असेच राहण्याची शक्यता देखील व्यापारी व्यक्त करत आहेत.