बुलडाणा - जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 वरून 12 वर गेली आहे. मंगळवारी चिखलीत पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. सदर रुग्ण दिल्लीवरून परत आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आला होता.
चिखलीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२ वर - चिखलीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
दिल्ली निजमुद्दीन मरकझ येथून परत आलेले चिखली येथील 2 देऊळगावराजा आणि खामगाव, शेगांव आणि सिंदखेडराजा येथे प्रत्येकी एक-एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यावरुन जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 11 वर गेला होता. यानंतर आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२ वर गेली आहे.
दिल्ली निजमुद्दीन मरकझ येथून परत आलेले चिखली येथील 2 देऊळगावराजा आणि खांमगाव, शेगांव आणि सिंदखेडराजा येथील एक-एक असे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यावरुन जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 11 वर गेला होता. यावेळी त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामधील 12 नमुन्यांचे अहवाल आले. त्यामध्ये 11 निगेटिव्ह आणि चिखलीतील एकाचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 12 वर पोहचला आहे.