महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा कोरोना अपडेट : शनिवारी एका नवीन रुग्णाची नोंद - Buldana corona update

शनिवारी आढळलेला कोरोनाबाधित हा 38 वर्षीय पुरुष आहे. तो मलकापूर येथील चैतन्य वाडीचा रहवासी आहे.तर आतापर्यंत 1430 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

Buldana corona update
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jun 6, 2020, 10:42 PM IST

बुलडाणा -जिल्ह्यात आज (शनिवारी) एक नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्याच्या अहवालांपैकी 18 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 15 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 01 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दोन अहवाल तपासणीसाठी पुन्हा पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली.

शनिवारी आढळलेला कोरोनाबाधित हा 38 वर्षीय पुरुष आहे. तो मलकापूर येथील चैतन्य वाडीचा रहवासी आहे.
तर आतापर्यंत 1430 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात एकूण 83 कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 50 जणांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 30 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details