महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारचाकीचा अपघात; एक ठार, तीन जखमी - बुलडाणा जिल्हा बातमी

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेड्यापासून काही अंतरावर एका चारचाकीचा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

By

Published : Nov 30, 2020, 10:18 PM IST

बुलडाणा- साखरखेड्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लव्हाळा फाट्यावर चिखली मेहेकर रस्त्यावर एका चारचाकी अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तीघे जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 30 नोव्हेंबर) सकाळी घडली.

साखळी खुर्द येथील सतपाल दगडू वाठोरे, मालताबाई दगडू वाठोरे लताबाई सतपाल वाठोरे हे विशाल सरकटे यांच्या मालकीची (एम एच 24 व्ही 8422) चारचाकी घेऊन परभणी येथे दवाखान्याच्या कामानिमित्त चालले होते. ब्रिजच्या बाजूच्या एकेरी रस्त्यावरून ही गाडी शेतात उलटली. यात सतपाल दगडू वाठोरे यांचा मृत्यू झाला असून चालक हंसराज रमेश ताजनेसह मालताबाई दगडू वाठोरे, लताबाई सतपाल वाठोरे हे गंभीर जखमी असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

एकेरी रस्त्याला बॅरीकेट नसल्याने होतात अपघात

चिखली मेहेकर रोडचे नवीन काम झाले असून लव्हाळा फाट्यावर ब्रिज उभारण्यात आला आहे. दरम्यान, अमडापूर साखरखेर्डा जाण्यासाठी ब्रिजजवळ एकेरी मार्ग आहे. मात्र, ब्रिजच्या बाजूला असलेल्या एकेरी मार्गावर उतार भाग आहे. या ठिकाणी बॅरीकेट लावण्याची गरज आहे. मात्र, बॅरीकेट नसल्याने अपघात होतात. त्यामुळे या धोकादायक रस्त्यावर तातडीने बॅरीकेट बसवावे, अशी मागणी संभाजी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप सवडदकर यांनी केली आहे.

हेही वाचा -बुलडाणा जिल्ह्यात 1 ते 16 डिसेंबरदरम्यान क्षय व कुष्ठरोगाची तपासणी

ABOUT THE AUTHOR

...view details