बुलडाणा - मलकापूर शहरालगत असलेल्या दाताळा शिवारामध्ये पोलिसांनी छापा टाकून दोन तोंडी मांडूळ जातीचा दुर्मीळ साप हस्तगत करण्यात आला. या कारवाईत विदेशी दारू, ९ मोटारसायकलींसह ३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मांडूळ सापाची बाजारात जवळपास १ लाख किंमत आहे.
मलकापुरात मांडूळ सापासह एकाला अटक हेही वाचा - तान्हाजी अखेर महाराष्ट्रात टॅक्स-फ्री
दाताळा शिवारामध्ये जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ आणि अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यांच्या पथकाने हा छापा टाकला होता.
हेही वाचा - शिक्षक पात्रता परीक्षेमधील चुकांचे व्हायरल सत्य...
या प्रकरणातील मुख्य आरोपी दिपक रामदास थाटे (वय ३६, रा. मलकापुर) याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी प्रिया ढाकणे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी करीत आहेत.