महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेहकर तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू तर चार जखमी - lightening strike in sonati

अंगावर वीज पडल्याने सोनाटी येथील शिवाजी बदल यांचा जागीच मृत्यू झाला. राजू शिरे, विष्णू गुंजकर, अंबादास कटारे, राम वाघमारे या चार जखमींवर मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

one died in lightening strike
वीज पडून एकाचा मृत्यू

By

Published : May 14, 2020, 12:32 PM IST

Updated : May 14, 2020, 2:27 PM IST

बुलडाणा -जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी गावात अवकाळी पाऊस सुरू असताना वीज पडून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेत शिवाजी किसन बदल यांचा जागीच मृत्यू झाला.

मेहकर रुग्णालयात जखमींवर उपचार

राजू मनु शिरे, विष्णू किसन गुंजकर, अंबादास दौलत कटारे, राम भगवान वाघमारे हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर मेहकारच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनाटी येथील गावानजीक एका शेतामध्ये गावातील सहा लोक बसलेले होते. अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात होवून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. ज्या झाडाखाली हे लोक बसलेले होते त्याच झाडावर अचानक वीज पडली.

Last Updated : May 14, 2020, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details