महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात कार झाडावर आदळून पत्नी ठार; पती जखमी

जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील तांबोळा गावानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमीस उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे.

अपघातग्रस्त कार

By

Published : Jul 7, 2019, 11:54 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील तांबोळा गावानजीक कार झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रविवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, जखमीस उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

लोणार तालुक्यातील तांबोळा गावापासून २ किमी अंतरावर हा अपघात झाला. यामध्ये भागवत दुधमोगरे हे (एम एच २८ ए झेड २६४५) कार घेऊन सरस्वती गावाकडून बिबी येथे जात होते. दरम्यान दुपारी ३ वाजता तांबोळा गावानजीक ही कार रस्त्या लगतच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातामध्ये शिला भागवत दुधमोगरे (वय २८ वर्षे) ही महिला जागीच ठार झाली तर तिचा पती भागवत दुधमोगरे (वय ३२ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा घडला ही बाब मात्र स्पष्ट होऊ शकली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details