महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून एकाचा मृत्यू - buldana nalganga dam

जिल्ह्यातील मलकापूर येथे नळगंगा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शहरातील नळगंगा नदीपात्रावरील तब्बल ६ ते ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. पारपेठ, सालीपुरासह अनेक परिसराचा शहराशी संपर्क तुटला होता. तर या पाण्याच्या प्रवाहाखाली सातही छोटे पूल बुडाले आहेत.

नळगंगा धरणातून पाणी सोडल्याने आलेल्या पुरात पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून एकाचा मृत्यू

By

Published : Nov 8, 2019, 6:12 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर येथे नळगंगा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शहरातील नळगंगा नदीपात्रावरील तब्बल ६ ते ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. पारपेठ, सालीपुरासह अनेक परिसराचा शहराशी संपर्क तुटला होता. तर या पाण्याच्या प्रवाहाखाली सातही छोटे पूल बुडाले आहेत. या पुलाला कठडे नसल्याने पारपेठ परिसरातील रहिवासी मोहम्मद रफिक मोहम्मद अफरोज हा ऑटो घेऊन जात असताना नदीपात्रात पडला. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याला वाचवण्यात अपयश आले.

नळगंगा धरणातून पाणी सोडल्याने आलेल्या पुरात पुलावरून ऑटो नदीपात्रात कोसळून एकाचा मृत्यू

वाहून गेलेल्या मो. रफिक मो. अफरोज याचा दीड तासानंतर शोध लागला. स्थानिकांनी त्याला नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे. मृताची ऑटोही नदीपात्रात वाहून गेली. तब्बल १६ वर्षानंतर नळगंगा धरण १०० टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. या पाण्याने नदीपात्रावर असलेल्या पुलांवरून पाणी असल्याने मलकापूर शहराचा नळगंगा नदीपात्रापलीकडील पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा, राजपुरा, मोहनपुरा परिसराचा संपर्क तुटला आहे. मात्र, पुलाला कठडे नसल्याने व पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details