बुलडाणा - जिल्ह्यातील लोणार पोलिसांनी दुचाकी चोरांचा पर्दाफाश करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून विविध कंपन्याच्या ११ दुचाक्या ताब्यात घेत ही कारवाई केली आहे. या आरोपीचे नाव हरीष खान नशीर खान (वय, 20 रा. काटेनगर) असे असून सीसीटीव्हीचा आधार घेत त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बुलडाणा : लोणारमध्ये 11 दुचाकीसह चोराला अटक - लोणार दुचाकी चोरी
लोणार शहरातील हरीष खान नशीर खान (वय, 20 वर्ष रा.काटेनगर लोणार) याने चोरून विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हरीष खान नसीर खान याला ताब्यात घेऊन चोरीच्या दुचाकी बाबत विचारपूस केली असता त्याने शहरातील 11 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली आहे.
पोलीस स्टेशन लोणार येथे दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा तपास लोणार पोलिसांनी केला. दरम्यान विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावर भर देत पथकाने चोरीच्या दुचाकीचा शोध घेतला. दरम्यान लोणार शहरातील हरीष खान नशीर खान (वय, 20 वर्ष रा.काटेनगर लोणार) याने चोरून विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हरीष खान नसीर खान याला ताब्यात घेऊन चोरीच्या दुचाकी बाबत विचारपूस केली असता त्याने शहरातील 11 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली आहे.
अशी केली जात होती चोरी
आरोपी हरीष दुचाकी चोरायचा व नंतर या चोरीच्या नंबर प्लेट बदलत होता. दुचाकीची आरसी बुकचे नंबरमध्ये खोडतोड करून आरसी बुकची कलर फोटो काढून त्याला लमीनेशन करून विकत होता. हा त्याचा व्यवसाय लोणार शहरात अंदाजे 5 ते 6 महिन्यापासून सुरू होता.
हेही वाचा-पुरवठा अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याने रेशन दुकानदाराकडून ग्राहकासह कुटुंबाला बेदम मारहाण