बुलडाणा - कमी पैशात सोन्याचे नाणे देतो असे सांगून नकली नाणे देत एकास १५ लाखांना गंडावल्याची घटना समोर आली आहे. तर कमी पैशात सोन्याची नाणी मिळत असल्याने अनेक नागरिक या आमिषाला बळी पडत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
नकली सोन्याचे नाणे देऊन १५ लाख रुपयांना गंडविले, एकास अटक
खामगाव तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. खामगाव तालुक्यातील दधम येथील दिलीप चव्हाण याने आपल्या साथीदाराच्या सहाय्याने अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील शेख असिफ शेख वाहिद याला १५ लाख रुपयात असली सोन्याचे नाणे दाखवून नकली नाणे दिले,
एकास गंडविले
सोन्याची असली नाणी दाखवून त्यांना नकली नाणे देऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. खामगाव तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. खामगाव तालुक्यातील दधम येथील दिलीप चव्हाण याने आपल्या साथीदाराच्या सहाय्याने अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील शेख असिफ शेख वाहिद याला १५ लाख रुपयात असली सोन्याचे नाणे दाखवून नकली नाणे दिले, याप्रकरणी शेख आरिफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलीप चव्हाण याला अटक केली आहे.