बुलढाणा - गुरुपौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. जे भाविक संत श्री गजानन महाराजांना गुरू मानतात ते महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी येतात. त्यामुळे शेगावात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी - गजानन महाराज
गुरुपौर्णिमा निमित्त विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी झाली होती. जे भाविक संत श्री गजानन महाराजांना गुरू मानतात ते महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी येतात. त्यामुळे शेगावात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
विशेष म्हणजे दुपारी तीन वाजल्यापासून चंद्र ग्रहणाचे वेध लागणार होते. त्यामुळे दुपारी दोन वाजेपासूनच महाराजांचे दर्शन बंद करण्यात आले होते. यावेळी सर्व भाविकांचे वर्षभराचे दिवस चांगले. आनंदित जावे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूला नमन करून नवीन वर्षाची सुरुवात करावी, हा उद्देश भाविकांच्या मनात असतो. त्यामुळे संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. नित्याप्रमाणे सकाळी पाच वाजता काकड आरती, त्यानंतर अकरा वाजता दुपारची आरती होऊन मंदिराची संपूर्ण दरवाजे बंद केले जातात. त्यामुळे सकाळपासूनच भाविकांची येथे गर्दी झालेली पाहायला मिळाली.