महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Old Man Murder : वाळूचा टिप्पर अडविला म्हणून वृद्धाचा खून; तिघा बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा

शेतातून रेतीचे टिप्पर नेण्यास मनाई (blocking sand tipper) केल्याच्या कारणावरून दबंगांच्या टोळक्याने वृद्ध व्यक्ती व त्याच्या मुलास काठी व लोखंडी टॉमीने मारहाण (Father and son beaten) करून जखमी केले. यानंतर बोलेरो कार वृद्ध व्यक्तीच्या अंगावर चढवून त्याची हत्या (old man murder) केली. ही धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव तालुक्यातील सुलतानपूर येथे सायंकाळी घडली. (Latest news from Buldana) या प्रकरणात पोलिसांनी तिघा पिता-पुत्रांविरूद्ध खुनाचा गुन्हा (Latest news from Buldana) दाखल केला आहे. (Buldana Crime) यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Old Man Murder
वृद्धाचा खून

By

Published : Dec 7, 2022, 7:35 PM IST

बुलडाणा :आमच्या परवानगीशिवाय रेतीचे टिप्पर शेतातून का नेले (blocking sand tipper) म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या वृद्ध व्यक्ती व त्याच्या मुलास काठी व लोखंडी टॉमीने मारहाण (Father and son beaten) करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता बोलेरो गाडी अंगावर टाकून (car run over old man) वृद्ध व्यक्तीचा खून (old man murder) केल्याची घटना देऊळगावराजा तालुक्यातील सुलतानपूर येथे सायंकाळी घडली. (Latest news from Buldana) या प्रकरणात पोलिसांनी तिघा बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून दोघांना अटक केली (Buldana Crime) आहे.


जाब विचारल्याने हत्या :आमच्या परवानगीशिवाय शेतातून ट्रक घेऊन जाऊ नका, असे सांगूनही फिर्यादीच्या शेतातून ट्रक घेऊन जाण्याबाबत फिर्यादीने आरोपींना जाब विचारला. याचा द्वेष मनात ठेवून फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांना आरोपींनी संगनमत करून लोखंडी टॉमी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच तिन्ही आरोपींनी संगतमताने बोलेरो जीप क्रमांक एम एच २८ ए झेड ९६८६ सह फिर्यादीच्या घरा बाहेर येऊन फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी ही आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीच्या अंगावर आणून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर फिर्यादीचे वडील तेजराव गोविंद डोईफोडे (वय ६०) यांच्या अंगावर चालवून त्यांना जीवे ठार मारले.

भांडणातून कार अंगावर चढविली:ही घटना तालुक्यातील सुलतानपूर येथे सोमवारी सायंकाळी सात वाजे दरम्यान घडली. फिर्यादी यांच्या शेतातून आरोपी हे त्यांच्या मालकीचे रेतीचे टिप्पर नेत होते. फिर्यादी यांनी वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने फिर्यादींनी त्यांच्या शेतातून जाणारे टिप्पर अडविले होते. यावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. व चिडून जाऊन आरोपीने फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या अंगावर बोलेरो जीप घातली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाला तर त्यांचे वडील जागीच मरण पावले. घटनेची माहिती मिळतात ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात एपीआय हेमंत शिंदे, एएसआय केशव मुळे, नायबराव मोगल, आदींनी घटनास्थळ गाठले.

सुलतानपूर गावात तणावाची स्थिती :मृतक तेजराव डोईफोडे यांचा मुलगा रावसाहेब तेजराव डोईफोडे (वय ३७, रा. सुलतानपूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रंगनाथ पुंजाजी डोईफोडे, शिवाजी रंगनाथ डोईफोडे व नरेश रंगनाथ डोईफोडे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी शिवाजी डोईफोडे व नरेश डोईफोडे या दोघांना अटक केली असून रंगनाथ डोईफोडे हे जालना येथे उपचार घेत आहे. खुनाच्या या घटनेनंतर सुलतानपूर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस प्रशासन तैनात आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात एपीआय हेमंत शिंदे करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details