महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : स्मशानभूमिच्या शेडला गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या - स्मशानभूमिच्या शेडला गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या

बुलडाण्याच्या चिखली रोडवरील हाजी मलंग परिसरात राहणारे हरीदास लोखंडे यांचा मृतदेह माळविहीरच्या स्मशानभूमित पत्र्याचा शेडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत वृद्धाच्या हातात स्मशानभूमिच्या रस्त्याबाबत एक जुना पंचनाम्याचा कागद आढळून आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

बुलडाणा : स्मशानभूमिच्या शेडला गळफास घेवून वृद्धाची आत्महत्या

By

Published : Nov 17, 2019, 10:21 PM IST

बुलडाणा - स्मशानभूमित वृद्धाने पत्र्याच्या शेडला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. शहरापासून काही अंतरावर असलेल्या माळविहीर शिवारातील स्मशानभूमित रविवारी (ता.१७) सकाळी ही घटना उघडकीस आली. हरीदास अमृता लोखंडे (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

हेही वाचा -बुलडाणा : पंचनामे पूर्ण होऊनही सरकार स्थापन न झाल्याने नुकसानभरपाई रखडली

बुलडाण्याच्या चिखली रोडवरील हाजी मलंग परिसरात राहणारे हरीदास लोखंडे यांचा मृतदेह माळविहीरच्या स्मशानभूमित पत्र्याचा शेडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत वृध्दाच्या हातात स्मशानभूमिच्या रस्त्याबाबत एक जुना पंचनाम्याचा कागद आढळून आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. हाजी मलंग पासून माळविहिर शिवारातील स्मशानभूमिपर्यंत रस्त्याचे काम करण्यासंदर्भात त्यांनी दोन ते तीन वेळा मागणी केली होती. रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही.

हेही वाचा -ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज

लोखंडे यांच्या हातात जुन्या पंचनाम्याची प्रत मिळालेल्या पंचनाम्यात रस्त्यावर अतिक्रमण केलेल्यांविरोधात पंच म्हणून लोखंडे यांची पहिल्याच क्रमाकांवर स्वाक्षरी आहे. हे निवेदन २५ जानेवारी २०१९ चे असून या कागदाचा आणि आत्महत्येचा काही संबंध आहे का ? याबाबत पोलीस तपास करत आहे. लोखंडे मजुरीचे काम करत होते. त्यांचा मुलगा राजू याने बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details