बुलडाणा -कोविड महामारीच्या संकट काळातही रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या आपले मनोधैर्य वाढवणाऱ्या पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळो अशीच प्रार्थना करत असतील. गुरुवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने बुलडाणा येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पूजाअर्चा केली.
बुलडाण्यात परिचारिकांनी साजरी केली वटपौर्णिमा
भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला महत्त्व आहे. सुहासिनीच कुंकू अबाधित राखणारा आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळू यासाठी वडाची पूजाअर्चा केली जाते. देवाकडे साकडे घालणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा आणि धागा बांधून वडाची पूजाअर्चा करतात. आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असं साकडं घालतात.
परिचारिकांनी साजरी केली वटपौर्णिमा