बुलडाणा - एका ३८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने शुक्रवारीडॉक्टर दाम्पत्य कोरोनाबाधित झाल्याचे आढळले होते. तर, आज शनिवारी 30 मे रोजी पुन्हा मलकापुरात तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्याच्या अहवालांपैकी रात्री उशिरा पुन्हा भीमनगर, मलकापूर येथील एक 60 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळली आहे. यामुळे मलकापूर येथे बाधितांची संख्या चार झाली आहे.
मलकापुरात आणखी एक महिला कोरोनाबाधित, आकडा 56वर - Buldana Corona Positive News
सध्या जिल्ह्यात एकूण ५६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत झाले आहेत. आतापर्यंत ३२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात २१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा न्यूज
सध्या जिल्ह्यात एकूण 56 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत झाले आहेत. आतापर्यंत 32 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 21 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.