बुलडाणा- शहरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात तिरंगा यात्रा काढण्यात आली. कुल जमाती तंजीम यांच्या वतीने 100 मिटरचा तिरंगा घेऊन ही यात्रा काढण्यात आली.
एनआरसी, सीएए विरोधात बुलडाण्यात 'तिरंगा यात्रा'
सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे काही दिवसांपासून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. येथील लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वचजण या कायद्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर बुलडाण्यातही शाहीन बागची निर्मिती करण्यात आली असून अनेक दिवसांपासून येथे आंदोलन सुरू आहे.
इंदिरा नगर येथून ही यात्रा संगम चौकातून जयस्तंभ चौकात स्थापित झालेल्या शाहीन बाग येथे पोहोचली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.