बुलडाणा -कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणारे रेमडेसीवीर इंजेक्शन आता 1 हजार 110 रु. ते 1 हजार 400 रुपयांपर्यंत जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात दिली. ते जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन घ्यावे लागत आहे. परंतु काही औषधी दुकानदार रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी किंमत कमी झालेली असताना देखील, जादा दराने हे इंजेक्शन विकत आहेत. या पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शुक्रवारी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. व त्यांना कमी दराने रेमडेसीवीर इंजेक्शनाची विक्री करण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यात रेमडेसीवर इंजेक्शन मिळणार अवघ्या 1 हजार 110 रुपयांमध्ये आता मिळणार 1 हजार 110 रुपयांना रेमडेसीवीर इंजेक्शन
डॉ.राजेंद्र शिगणेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत, औषधी दुकानदारांनी जिल्ह्यामध्ये 1 हजार 110 रु. ते 1 हजार 400 रु. पर्यंत रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.