बुलडाणा - सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सुटाळा येथील त्यांच्या घरी रात्री आठ वाजता निधन झाले. बोरकर ६३ वर्षांचे होते, त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक साहित्यिक, कलावंत, लेखक, पत्रकार उपस्थित होते.
आपल्या आगळ्यावेगळ्या अस्सल वऱ्हाडी लिखाणाच्या माध्यमातून ते प्रसिद्ध होते. ग्रामीण भागाचे वास्तव मांडणारी ' मेड इन इंडिया ' ही कादंबरी चांगलीच गाजली. या कादंबरीवर १९९० मध्ये नागपूर आकाशवाणीवर तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आले.